राष्ट्रवादीचे सगळे आमदार संपर्कात- जयंत पाटील
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार नॉट रिचेबल झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही धाकधूक वाढली आहे. अशातच राष्ट्रवादीचे सगळेच आमदार आमच्या संपर्कात असल्याचे जयंत पाटील म्हणाले. शिवसेनेच्या आमदारांचा मुद्दा सहा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा असून त्यावर मी साध्याच काही भाष्य करू शकणार नाही असे मत राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. अजित पवार यांच्या […]
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार नॉट रिचेबल झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही धाकधूक वाढली आहे. अशातच राष्ट्रवादीचे सगळेच आमदार आमच्या संपर्कात असल्याचे जयंत पाटील म्हणाले. शिवसेनेच्या आमदारांचा मुद्दा सहा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा असून त्यावर मी साध्याच काही भाष्य करू शकणार नाही असे मत राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. अजित पवार यांच्या कार्यालयात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून अनपेक्षित खेळीमुळे यामागे नेमका कोणाचा हात आहे असा प्रश्न राजकारण्यांसह सर्वसामान्यांनाही पडला आहे.