रायगडावर जाणाऱ्या सर्व वाटा बंद, ढगफूटी सदृश्य पावसाने पायऱ्यांवरुन धबधबा सुरु झाल्याने शासनाचा निर्णय

| Updated on: Jul 08, 2024 | 8:52 PM

लोणावळा भूशी डॅम परिसरातील धबधब्यातील पाणी अचानक वाढल्याने एकाच कुटुंबातील पाच सदस्य वाहून गेल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर सर्वच पर्यटनस्थळांवर काळजी घेतली जात आहे.

लाखो शिवप्रेमींचे श्रद्धास्थान असलेला स्वराज्याची राजधानी असलेला रायगड पर्यटक आणि शिवप्रेमीसाठी बंद करण्यात आला आहे. रायगड किल्ल्यात काल ढगफूटी सदृश्य पर्जन्यवृष्टी झाल्याने महाद्वारातील पायऱ्यावरुन दुथडी भरुन धबधबा वाहू लागला आहे. त्यामुळे सावधानता म्हणून रायगडावर जाणारे सर्व मार्ग बंद करण्याचा निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. रायगडावरील ‘रोप-वे सेवा’ देखील बंद केलेली आहे. या रायगडाच्या दगडी पायऱ्यांवरुन अचानक पाण्याचे मोठे धबधबे वाहू लागल्याने पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने हा निर्णय घेतला गेला आहे. लोणावळा येथील भूशी डॅमजवळील धबधब्यात अचानक पाणी वाढल्याने एकाच कुटुंबातील पाच सदस्य वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यानंतर सरकारने सर्वच धबधबे, नदी आणि धरणाच्या परिसरात सीआरपीसीचे कलम 144 जमावबंदी लागू केली आहे. तरीही पर्यटक अशा ठिकाणांवर बंदी मोडून मौजमस्ती करण्यासाठी जातच आहेत.

 

 

Published on: Jul 08, 2024 08:50 PM
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,’ म्हणाले फडणवीस साहेब त्यांना जरा नीट समजवा..
Mumbai Rain Update : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी धुव्वाधार… मुसळधार पावसानं दाणादाण, कुठं काय होती स्थिती?