आरक्षणाच्या बाजूने सर्व पक्ष तरीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, पद्यामागे काय घडतंय?
मनोज जरांगे पाटील यांची जी मराठा आरक्षणाची जी काही मागणी आहे त्याला सर्वच पक्षांनी पाठींबा दिलाय. सध्या सर्व पक्ष आरक्षणाच्या बाजूनं आहेत. तरीही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तर, जरांगे पाटील मराठा आणि ओबीसी बांधवांनी राजकीय नेत्यांच्या आरोपांना बळी पडू नये. असं आवाहन करताहेत, नेमक काय घडतंय?
मुंबई : 6 सप्टेंबर 2023 | निजामकाळात ज्या मराठा समाजाची कुणबी अशी नोंद आहे त्यांना कुणबीचं सर्टिफिकेट दिलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावरुन विविध संघटना आणि पक्षांच्या भूमिका समोर येत आहेत. तर, मनोज जरांगे पाटील यांनी लोकांनी राजकारणाला बळी पडू नये, असं आवाहन केलंय. त्यामुळे जरांगे पाटील ज्यासाठी उपोषणाला बसले होते त्याला प्राथमिक पातळीवर तरी तूर्तास यश आल्याचं दिसतयं. त्याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जसं याआधी फडणवीसांना मराठा समाजाला आरक्षण दिलं तसंच आमचं सरकार देईल असं दुपारी म्हटलं. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारनं तेव्हा व्यवस्थित तथ्ये मांडली असती तर कोर्टात आरक्षण टिकलं असते असं म्हटलं. तोडगा कसा काढणार यासाठी सर्व मराठा समाजाच्या नेत्यांनी सरकारसोबत एक फॉर्म्युला ठरवून निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले. मात्र, पडद्यामागे नेमकं काय घडतंय पाहा हा स्पेशल रिपोर्ट…