Special Report | फक्त एकमेकांचे हिशेब चुकते केले जातायत का?
Image Credit source: TV9

Special Report | फक्त एकमेकांचे हिशेब चुकते केले जातायत का?

| Updated on: Apr 24, 2022 | 11:11 PM

डर्टी डझन विरुद्ध साडे तीन नेत्यांचं हे युद्ध आता कारवायांपर्यंत येऊन पोहोचल्याचं बोललं जातंय. ज्यात दोन्ही बाजूनं प्रत्येक अॅक्शन रिअॅक्शन दिली जातेय. कारवायांवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचा आरोप प्रत्यारोपांचा दुसरा अंक सुरु झालाय.

मुंबई : अनिल देशमुख ते नवाब मलिकांविरुद्ध आणि दुसरीकडे कंगना रनौतपासून मोहित कंबोजांपर्यंत अनेकांवर कारवाया झाल्या. डर्टी डझन विरुद्ध साडे तीन नेत्यांचं हे युद्ध आता कारवायांपर्यंत येऊन पोहोचल्याचं बोललं जातंय. ज्यात दोन्ही बाजूनं प्रत्येक अॅक्शन रिअॅक्शन दिली जातेय. कारवायांवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचा आरोप प्रत्यारोपांचा दुसरा अंक सुरु झालाय. सरकारमधील आतापर्यंत अनिल देशमुख आणि नवाब मलिक तुरुंगात आहेत. तर विरोधकांमधील आतापर्यंत नारायण राणे, नितेश राणे आणि राणा दाम्पत्य तुरुंगात गेलेत. कारवायांवरुन दोन्हीकडून सूडाचा आरोप होतोय.

Special Report | नारा मनसेचा, पुकारा राणांचा,हल्ला सोमय्यांवर
दगडफेक करणारे शिवसैनिक असतील तर त्याचा आम्हाला अभिमान