Rajendra Janjal | औरंगाबाद महापालिकेत शिंदे सेना आणि भाजपचा युती, पालिका ताब्यात घेण्यासाठी काय आहे प्लॅन?

| Updated on: Jul 28, 2022 | 3:21 PM

Rajendra Janjal | औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम आता वाजत आहे. त्यापूर्वीच शिंदे गटाने एक पाऊल पुढे टाकत भाजपसोबत ही निवडणूक जिंकण्याची चाल खेळली आहे.

Rajendra Janjal | औरंगाबाद महापालिकेच्या (Aurangabad Municipal) निवडणुकीचे (Election) पडघम जोरात वाजू लागले आहेत. शिंदे गटाच्या (Eknath Shinde) बंडखोरीनंतर आता सत्तेच्या वाटेकऱ्यात आणखी एक जण दावेदारी करणार आहे. औरंगाबादमध्ये शिंदे गटाने भाजपसोबत युती करत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा डावा टाकला आहे. शिंदे गटात नुकतेच सहभागी झालेले माजी महापौर राजेंद्र जंजाळ (Rajendra Janjal) यांनी प्रसार माध्यमांना याविषयीची माहिती दिली आहे. हिंदुत्वासोबतच विकासाचा ही हुंकार यावेळी भरण्यात आला. जागा वाटपांबाबत वरिष्ठस्तरावर निर्णय घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. महापालिकेला कामांसाठी मोठा निधी (Funds) लागतो. त्यामुळे निधी मिळवण्यासाठी राज्य शासनाकडे मदत मागावी लागते. आता राज्यात शिंदे सेनेसह भाजपच सरकार आल्याने निधीची कमतरता भासणार नसल्याचा विश्वास जंजाळ यांनी व्यक्त केला. तसेच या निधीच्या माध्यमातून नागरी समस्या सोडवण्याचे वचन त्यांनी यावेळी दिले.

Published on: Jul 28, 2022 03:21 PM
27 टक्के आरक्षण आम्हाल मान्य नाही, मराठा मोर्चाचा सरकारला इशारा
robbers jailed | झारखंडमधील दरोडेखोरांची टोळी जेरबंद, पुणे पोलिसांची जबरदस्त कामगिरी