Uday Samant | खातेवाटप झाले नसले तरी काम मात्र जोरात सुरु, उदय सामंत यांचा विरोधकांना टोला

| Updated on: Aug 11, 2022 | 3:38 PM

Uday Samant | खातेवाटप झाले नसले तरी काम मात्र जोरात सुरु असल्याचा टोला कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे.

Uday Samant | खातेवाटप (Ministry Allocation) झाले नसले तरी काम मात्र जोरात सुरु असल्याचा टोला कॅबिनेट मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विरोधकांना लगावला आहे. आतापर्यंत मंत्रीमंडळ स्थापन कधी होणार हाच प्रश्न विरोधक विचारत होते. आता मंत्र्यांना कधी खातेवाटप करण्यात येणार आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. परंतू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली धडाक्यात काम सुरु असून खातेवाटप सध्या जरी झाले नसले तरी काम मात्र जोरात सुरु असल्याचा टोला त्यांनी लगावला. असे असले तरी खातेवाटप लवकरच होईल, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. तसेच खातेवाटपावरुन कसला ही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणीही नाराज नाही. ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही आणि ज्यांना मिळाले त्यांना या सर्व गोष्टी माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळी अधिवेशनाचे (Monsoon Session) सूप वाजल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Nana Patole | एकीकडे दोस्ती करायची आणि पाठीवर वार करायचा,ही काँग्रेसची वृत्ती नाही, नाना पटोले यांचा घणाघात
Jayant Patil | कोरोनासारखी स्थिती नसताना ही सरकारची अधिवेशन घेण्यास टाळाटाळ, जयंत पाटील यांचा आरोप