उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं का? अंबादास दानवे यांचं मत काय?

| Updated on: Jul 05, 2023 | 1:00 PM

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र यावे यासाठी मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आवाहन करत आहे. यासाठी राज्यात ठिकठिकाणी बॅनर्सही झळकले आहेत. या चर्चांवर आता ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय सत्तानाट्य सुरु झालं आहे. या सत्तानाट्यादरम्यान पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? अशी चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र यावे यासाठी मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आवाहन करत आहे. यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येत ठिकठिकाणी बॅनर्सही लावत आहेत. राज आणि उद्धव एकत्र येणार का? या चर्चांवर आता ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे, आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करतो. युतीचा निर्णय हा पक्षप्रमुखांचा आहे. तो जो निर्णय घेतील त्याला आमचे समर्थन असणार आहे,” असं अंबादास दानवे म्हणाले.

 

 

Published on: Jul 05, 2023 01:00 PM
अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादीच्या आमदाराचे थेट आरोप? आरोपानंतर एकच खळबळ
Maharashtra Politics : ‘महाराष्ट्रातलं सगळं राजकारण नासवलं’; कायदेतज्ज्ञाचा फडणवीस यांच्यावर घणाघात