Ambadas Danve : ‘तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही?’ दानवे-महाजनांची हमरी-तुमरी

| Updated on: Mar 20, 2025 | 4:19 PM

Ambadas Danve - Girish Mahajan Clashes : विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात आज विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी झालेली आज बघायला मिळाली. हा वाद वाढल्याने सभागृहाचं कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज चांगलाच गदारोळ झालेला बघायला मिळाला. दिशा सालियान प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केल्याने विरोधक देखील आक्रमक झालेले दिसले. याच मुद्द्यावरून विधान परिषदेच्या कामकाजात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे चांगलेच संतापलेले दिसले. मंत्री गिरीश महाजन यांच्याशी अंबादास दानवेंची खडाजंगी झाल्याने 15 निटांसाठी विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करावं लागलं.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये आज जोरदार बाचाबाची झाली. अंबादास दानवे सभागृहात बोलताना म्हणाले की, ”सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नाहीत? मग त्यांच्या वेळेनुसार कामकाज चालणार आहे का? सभापती महोदय सभागृहाच्या कामकाजाचा क्रम असतानाही तुम्ही एकाचवेळी चार-चार जणांना बोलण्याची परवानगी देता? तुम्हाला (दिशा सालियन मृत्यू प्रकरण) चौकशी करायची तर करा. एसआयटी नेमलेली आहे. काही अडचण नाही. मात्र, एका व्यक्तीच्या विरोधात चार-चार जणांनी बोलायचं का? असा प्रश्न दानवे यांनी केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन मध्येच बोलले, त्यानंतर दानवेंचा पारा चढला. मी तुमच्याशी बोलत नाही, मला बोलूद्या. सभापती महोदय मंत्र्यांचा हस्तक्षेप थांबवायला हवा. नाहीतर मी जातो, त्यानाच बोलूद्या म्हणत दानवे संतापले. ही हमरी-तुमरी एवढी वाढली की अंबादास दानवे आणि गिरीश महाजन हे एकमेकांच्या अंगावर धावून जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, तेव्हाढ्यात विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सभागृहाचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केलं.

Published on: Mar 20, 2025 04:19 PM
Chitra Wagh Video : ‘ओ अनिल परब, हिंमत आहे तुमच्यात…आम्हाला हलक्यात घेऊ नका’; चित्रा वाघ सभागृहात कडाडल्या
Nagpur Violence : नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?