“राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही”, ठाकरे गटाचा दावा
अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात काही युवक औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत होते, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होत आहे.या संपूर्ण घटनेवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात काही युवक औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत होते, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होत आहे.या संपूर्ण घटनेवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सगळे नुसते बोलबच्चन लोकं आहेत.अहमदनगरमध्ये औरंगजेबाचा फोटो घेऊन काल लोकं नाचत होते. दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादमध्ये औरंगजेबचा फोटो घेऊन लोकं नाचत होते. हे स्वत:ला मोठे हिंदुत्ववादी समजून घेतात. औरंगजेबाचं लोक एवढं उदात्तीकरण करत आहेत. यांनी काय कारवाई केली? हे फार हिंदुत्ववादी आहेत ना? मग आरोपींना अटक करणार का?, असे सवाल दानवे यांनी केले. “मंत्रिमंडळ विस्तारात किती जागा भेटतील याचा आधी विचार करुन ठेवा. कित्येक लोक म्हणतात की, यांना आता भाजपच्या चिन्हावर लढावं लागणार आहे. भाजप हेच करणार आहे. लढा पण आमच्या चिन्हावर लढा. कॅबिनेटचा विस्तार हे करत करतच राहून जातील”, असं अंबादास दानवे म्हणाले. “तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, असा दावा केला आहे. सत्ताधारी पक्षांना आमदार पळून जाण्याची भीती असल्याने मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. सरकारकडून फक्त वेळकाढूपणा केला जाईल”, असा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे.