किरीट सोमय्या यांच्याविरोधात ठाकरे गट आक्रमक; केली निलंबनाची मागणी!
विधानपरिषदेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "सोमय्या यांच्या निलंबनाची मागणी आम्ही केलेली आहे. जोपर्यंत निलंबित होत नाही, तेव्हापर्यंत आमचा लढा सुरूच राहील," असं दानवे म्हणाले.
मुंबई, 20 जुलै 2023 | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा एक कथित अश्लील व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओची विधिमंडळ अधिवेशनातही चर्चा झाली. या व्हिडीओवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानपरिषदेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, “सोमय्या यांच्या निलंबनाची मागणी आम्ही केलेली आहे. जोपर्यंत निलंबित होत नाही, तेव्हापर्यंत आमचा लढा सुरूच राहील. सोमय्या लंपट माणूस आहे आणि यासाठीच आम्ही आज विधानभवनाच्या पायऱ्या वरती आक्रमक भूमिका घेतली.”
Published on: Jul 20, 2023 09:43 AM