‘मी म्हणजे देश ही वृत्ती कुणाची?’ मोदी यांनी केलेल्या ‘त्या’ टिकेवर शिवसेना नेत्याची घणाघाती टीकास्त्र

| Updated on: Aug 08, 2023 | 2:34 PM

तसेच विरोधकांची इंडिया ही घमंडी लोकांची युती असल्याची टीका केली. यावेळी मोदी यांनी, काही लोकांना खूप अभिमान आहे. घमंडी आघाडीला आम्हाला एकजुटीने उत्तर द्यावे लागेल. त्यावरून आता विरोधक आक्रमक झाले आहेत.

मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | आज अविश्वास ठरावाच्या आधी भाजपप्रणित आघाडीची बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच विरोधकांची इंडिया ही घमंडी लोकांची युती असल्याची टीका केली. यावेळी मोदी यांनी, काही लोकांना खूप अभिमान आहे. घमंडी आघाडीला आम्हाला एकजुटीने उत्तर द्यावे लागेल. त्यावरून आता विरोधक आक्रमक झाले आहेत. तर याच टीकेवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पलटवार केला आहे. दावने यांनी, देशात सर्वात जास्त घमंड कुणाला आहे? हे देशाला नाही तर जगालाही माहिती आहे. मी म्हणजे देश ही वृत्ती कुणाची आहे? हे देखील सर्वांना माहित आहे. त्यामुळे सध्या जो लढा देशात उभा राहत आहे तो लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीचा आहे. हुकूमशाही विरुद्ध लढा इंडियाच्या माध्यमातून लढला जात आहे.

Published on: Aug 08, 2023 02:34 PM
“संसदेत भाषण करताना संजय राऊत यांनी 90…”, नितेश राणे यांचा हल्लाबोल
नागपुरकरांची लाईफलाईन असलेली ‘आपली बस’ महापालिका प्रशासनासाठी डोईजड?