‘चार दिवस द्या म्हणणाऱ्यांना 14 महिने झाले तरी आरक्षण दिलेलं नाही’; शिवसेना नेत्याची भाजपवर घणाघाती टीका

| Updated on: Aug 09, 2023 | 12:16 PM

आरक्षणाच्या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगरहून हजारो कार्यक्रते हे आझाद मैदान व मंत्रालयासमोर जमणार आहेत. तर यावेळी आरक्षणाबाबत तातडीने ठोस भूमिका सरकारने न घेतल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर काळे झेंडे लावण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे देण्यात आला आहे.

औरंगाबाद, 9 ऑगस्ट 2023 । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगरहून हजारो कार्यक्रते हे आझाद मैदान व मंत्रालयासमोर जमणार आहेत. तर यावेळी आरक्षणाबाबत तातडीने ठोस भूमिका सरकारने न घेतल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर काळे झेंडे लावण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे देण्यात आला आहे. यावरून विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाना साधला आहे. तर मराठा समाज अनेक वर्षांपासून आरक्षण मागत आहे, यासाठी आता केंद्राने कायदा करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. तर भाजपवर टीका करताना, मराठा आरक्षणावरून बोलताना भाजपने आमच्या हातात सत्ता द्या चार दिवसात आरक्षण देतो असे म्हटलं होतं. मात्र सरकार येऊन 14 महिने झाले तरी आरक्षण दिलेलं नाही. मराठा समाजासह धनगर समाजाचीही दिशाभूल भाजपने केली आहे.

Published on: Aug 09, 2023 12:16 PM
“दशतवादी हल्ला, महापूर ते नैसर्गिक आपत्ती, मुंबईकर एकजूटीने लढतात”, अजित पवार यांच्याकडून मुंबईकरांना सलाम
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, काय आहे प्रकरण?