‘भाजपला तेच तर हवं; पण काहीही करा तुम्हाला आम्ही घरिचं बसवू’; ठाकरे गटाच्या नेत्याचा शिंदे गटाला इशारा
तर याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असल्याचे सुट्टीवर गेले आहेत. तर याचदरम्यान शिंदे गटासह ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्र प्रकरणाच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रक्रिया सुरू केली आहे. यावरूनच आता शिंदे गटातील आमदारांत कमालिची चुळबूळ सुरू झाली आहे.
मुंबई, 14 ऑगस्ट 2023 | सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घटना घडत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठका होताना दिसत आहेत. तर याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असल्याचे सुट्टीवर गेले आहेत. तर याचदरम्यान शिंदे गटासह ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्र प्रकरणाच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रक्रिया सुरू केली आहे. यावरूनच आता शिंदे गटातील आमदारांत कमालिची चुळबूळ सुरू झाली आहे. तर यावरून येणाऱ्या तांत्रिक अडचणीवरून शिंदे गटातील काही आमदारांची अस्वस्थतता दिसून आली आहे. तर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचं मोठ विधान केलं आहे. तसेच याबाबचे निर्णय एकनाथ शिंदे घेतील. ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ,असं किशोर पाटील म्हणाले आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. दानवे यांनी, राजकीय दृष्ट्या अस्वस्थता काही आमदारांनी सुद्धा प्रकट केली आहे. तांत्रिक दृष्ट्या चिन्ह नाही मिळालं तर भाजपच्या चिन्हावर उभं राहू असे त्यांनी म्हटलं आहे. हेच तर भारतीय जनता पार्ट्रीला हवं आहे. आपल्याच चिन्हावर आमचेच लोक आणि म्हणून हे काही आमदारांनी त्या पद्धतीचं वक्तव्य केलं आहे. पण तुम्ही काहीही करा. कोणत्याही चिन्हावर उभं राहता? कोणतेही रहा. तुम्हाला घरी कसं पाठवायचं? याचा संकल्प शिवसैनिकांनी या महाराष्ट्रात केल्याचा टोला लगावला आहे.