उद्धव ठाकरे-राज ठाकरे भेटीच्या तर्क वितर्कांवर शिवसेना नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला, ‘दोघे भाऊ एकत्र…’
तर ते दोघेही एकत्र येणार असल्याच्या चर्चांना आता उत येत आहे. तर ठाकरे बंधूच्या भेटीवर अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत. यावरून जोरदार चर्चा रंगली असतानाच ठाकरे गटाचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना फोन करणार आहेत. तर ते दोघेही एकत्र येणार असल्याच्या चर्चांना आता उत येत आहे. तर ठाकरे बंधूच्या भेटीवर अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत. यावरून जोरदार चर्चा रंगली असतानाच ठाकरे गटाचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी, राज आणि उध्दव ठाकरे हे दोघे बंधू आहेत. शिवसेना प्रमुख यांच्या स्मरकवर चर्चा करण्यासाठी ते एकत्र आले असतील. आणि जर ते एकत्र आलेच तर चांगली गोष्ट आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांसोबत काम केलं आहे. यासाठी जर भेट होत असेल तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. हे दोघे भाऊ एकत्र येत असतील तर कुणाला वाईट वाटायचं कारण नाही. राजकारणासाठी त्या दोघांनी विचार करायचा की नाही हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही मात्र उध्दव ठाकरे सांगतील तसं काम करणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.