‘शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष, फुटीरांना धाक राहिलेला नाही’; राष्ट्रवादीच्या सध्याच्या घडीवर भाष्य
तर शरद पवार गटातून अनेक नेते हे अजित पवार गटात सत्तेमुळे तसेच मतदारसंघातील निधीच्या कारणाने जाताना दिसत आहेत. यादरम्यान शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीत कोणतीच फूट पडलेली नसून शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे विनडणूक आयोगाला सांगितलं आहे.
मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या फार उलथा पालथ होताना दिसत आहे. तर शरद पवार गटातून अनेक नेते हे अजित पवार गटात सत्तेमुळे तसेच मतदारसंघातील निधीच्या कारणाने जाताना दिसत आहेत. यादरम्यान शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीत कोणतीच फूट पडलेली नसून शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे विनडणूक आयोगाला सांगितलं आहे. त्यावरूनही आता राज्याच्या राजकिय क्षेत्रात संभ्रम निर्माण झाला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी, शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर सध्या पक्ष पातळीवर फुटीरांना धाक राहिला नाही. भाजपचे लोक फुटले असते तर त्यांचं सदस्यत्व टिकलं असतं का? असा सवाल केला आहे. तर स्वतःच्या फायद्यासाठी कायद्याचा वापर केला जातोय अशी टीका देखील त्यांनी केलीय. याचबरोबर शरद पवार हे एका विचारसारनीने काम करणारे नेते आहेत ते भाजप सोबत जाणार नाहीत असे देखील दानवे यांनी म्हटलं आहे.