दानवे यांची शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका म्हणाले, ‘पक्ष फोडून सत्ता स्थापन होवू शकत नाही’

| Updated on: Aug 03, 2023 | 12:22 PM

अजित पवार यांनी राष्ट्रावादी काँग्रेस फोडून सत्तेत प्रवेश केल्याने आता मविआ फूटली, त्यांच्या वज्रमूठीतली ताकद गेल्याची टीका सत्ताधारी भाजप शिंदे गटाकडून केली जात होती.

मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असणाऱ्या पावसामुळे महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षांची वज्रमूठ सभा झाल्या नव्हत्या. तर अजित पवार यांनी राष्ट्रावादी काँग्रेस फोडून सत्तेत प्रवेश केल्याने आता मविआ फूटली, त्यांच्या वज्रमूठीतली ताकद गेल्याची टीका सत्ताधारी भाजप शिंदे गटाकडून केली जात होती. त्याचदरम्यान आता मविआच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक चर्चगेट येथील एमसीए लाऊंज येथे पार पडली. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील उपस्थित आमदारांना मार्गदर्शन केले. यानंतर विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी विरोधकांवर टीका करताना आता 15 ऑगस्टनंतर मविआचे दौरे सुरू होणार असून महाराष्ट्राच्या काणोकोपऱ्यात सभा होतील असे सांगितलं. तसेच दोन चार आमदार फोडून जर कोणाला मविआ कमजोर होईल असे वाटत असेल तर तसे होणार नाही असा इशारा दिला आहे. तर काही गेल्यामुळेच आता मविआ आनखी मजबूत झाल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. तर पक्ष फोडून सत्ता स्थापन होवू शकत नाही असा देखील टोला त्यांनी भाजप शिंदे आणि अजित पवार यांना लगावला आहे.

Published on: Aug 03, 2023 12:22 PM
जेव्हा अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले; पाहा राहुल नार्वेकर यांनी काय केलं…
“सर्व नियमांचं पालन करून अपात्रतेचा निर्णय घेणार”, राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया