Maharashtra Politics : भाजपवर शिवसेना नेत्याचा निशाना; म्हणाला, ‘घटक पक्षांची ताकत भाजपने संपवली’
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाच प्रश्न केला होता.
औरंगाबाद : महायूतीत सध्या मित्र पक्षांची नाराजी पहायला मिळत आहे. काही दिवसांपुर्वीच रासप नेते महादेव जानकर यांनी आपल्या मनातकील खदखद बोलून दाखवली होती. त्यापाठोपाठ प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाच प्रश्न केला होता. त्यांनी बावनकुळे यांना घटकपक्षांची आठवण झाली नाही. की अजून आमचा नंबर आला नाही, हे अद्याप समजलं नाही असं सुनावलं होते. त्यानंतर आता भाजपने मित्र पक्षांची बैठक बोलवली आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर हल्लाबोल करत खरमरीत टीका केली आहे. त्यांनी भाजपला आता कोणतेही घटक पक्ष उरलेले नाहीत. घटक पक्षांची ताकत भाजपनेच संपवलेली आहे. तर वापरून फेकून द्या ही नीती भाजपने सतत वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. Maharashtra Politics