VIDEO : मनिषा कायंदे नॉट रिचेबल? ठाकरे गटाच्या नेत्याचं दोनच शब्दात उत्तर, म्हणाला…

| Updated on: Jun 18, 2023 | 1:13 PM

काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच आता आमदार मनिषा कायंदे या तीन माजी नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्याच्याआधी त्या नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोन बंद आहे. शिवाय त्यांच्याशी संपर्क होत नाहीये.

मुंबई : शिवसेना पक्षाचा उद्या वर्धापन दिन आहे. त्याआधी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच आता आमदार मनिषा कायंदे या तीन माजी नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्याच्याआधी त्या नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोन बंद आहे. शिवाय त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. यावरून ठाकरे गटाचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कोण? कोण नॉट रिचेबल आहे. काही नाही पावसामुळं रेंज गेली असेल असं म्हणत यावर अधिक बोलण टाळलं आहे. याच्या उलट मात्र मनिषा कायंदे या शिंदे गटात प्रवेश करण्यावर ठाम आहेत.

Published on: Jun 18, 2023 01:13 PM
“सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री,” बावनकुळेंच्या दाव्यावर राऊत म्हणतात…
फायरब्रॅड नेत्या मनिषा कायंदेंचा शिवसेनेत प्रवेश; भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…