“एकनाथ शिंदे यांना वर्षभरासाठीच मुख्यमंत्री राहायला सांगितलं होतं”, ठाकरे गटाच्या आमदाराचं मोठं वक्तव्य
"येत्या 10 ऑगस्टच्या आसपास एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतरा बाबादचा निर्णय होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपद अजित पवार यांना देण्यात येईल," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. यावरून आता ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 25 जुलै 2023 | अजित पवार यांनी उपमख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील यावर भाष्य करत मोठं विधान केलं आहे. “येत्या 10 ऑगस्टच्या आसपास एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतरा बाबादचा निर्णय होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपद अजित पवार यांना देण्यात येईल,” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. यावरून आता ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदे यांनी वर्षभरासाठीच मुख्यमंत्री राहायला सांगितलं होत, त्यामुळे नवीन मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे,” असं दानवे म्हणाले.
Published on: Jul 25, 2023 08:42 AM