फक्त औरंगाबाद शहराचं नाव बदललंय की जिल्ह्याचं? देवेंद्रजी स्पष्ट करा, अन्यथा…; अंबादास दानवे यांचा सवाल..
औरंगाबादच्या नामांतराला केंद्र सरकारकडून मंजूरी मिळाल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत सरकारला आणि विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारले आहेत. पाहा ते काय म्हणालेत.
औरंगाबाद : औरंगाबादच्या नामांतराला केंद्र सरकारकडून मंजूरी मिळाल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत सरकारला आणि विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारले आहेत. यांवेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही दाखला दिला आहे. “९ मे १९८८ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ९ मे १९८८ रोजी ‘संभाजीनगर’ हे नाव तत्कालीन औरंगाबाद ला दिले होते. शिवसेनेच्या ताब्यातील महापालिकेने याचा दोनदा प्रस्ताव मंजूर केला तर राज्यस्तरावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली होती. हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा.. ता. ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद’, असे यापुढे लिहावे लागेल का हे पण सांगा देवेंद्र फडणवीसजी!”, असं ट्विट अंबादास दानवे यांनी केलं आहे.