“बच्चू कडू यांचा नेमका गॉडफादर कोण?” ‘त्या’ भूमिकेवरून अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी काल आपली भूमिका मांडली. यावेळी पत्रकार परिषद घेत बच्चू कडू यांनी मी मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो,असं म्हटलं. बच्चू कडू यांच्या या भूमिकेनंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे.
मुंबई : अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी काल आपली भूमिका मांडली. यावेळी पत्रकार परिषद घेत बच्चू कडू यांनी मी मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे. त्यानंतर मी 18 तारखेला माझा निर्णय घेणार आहे, असं म्हटलं. बच्चू कडू यांच्या या भूमिकेनंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “बच्चू कडू यांचा नेमका गॉडफादर कोण आहे? तेच आम्हाला कळत नाही. आधी म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला म्हणून मी राज्यमंत्री झालो. त्यानंतर म्हणतात फडणवीस यांनी फोन केला म्हणून मी गुवाहाटीला गेलो. आता म्हणतात 18 तारखेला मला मुख्यमंत्र्यांनी बोलावलंय. नेमकं त्यांच्या मनात आणि डोक्यात काय सुरू आहे, तेच करायला मार्ग नाही. त्यांनी त्यांचा गॉडफादर कोण आहे ते ठरवावं मग बोलावं.”
Published on: Jul 14, 2023 07:32 AM