Ambadas Danve on Cabinet Expansion : मंत्रिमंडळात गद्दार आणि भ्रष्टाचारी मंत्री, आमदार अंबादास दानवे यांचा आरोप
अब्दुल सत्तार यांनी स्वत:च्या संस्थेमध्ये स्वत:चे मुलं, स्वत:च्या मुली आणि स्वत:चे नातेवाईक, हा प्रश्न मीडियानं समजून घ्यावा, असं यावेळी शिवसेना आमदार अंबादास दानवे म्हणालेत. अधिक जाणून घ्या...
मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) पार पडला. आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी शिंदे गटाचे 9 तर भाजपचे 9 असे एकूण 18 मंत्र्यांना गोपनियतेची शपथ दिली. असं असलं तरी या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यावरुन विरोधकांनी शिंदे (Eknath Shinde) आणि फडणवीसांवर जोरदार टीका केलीय. दरम्यान, शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, ‘ज्या गावितांवर सतत आरोप झाले ते या मंत्रिमंडळात आहेत, जे मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वत:च्या संस्थेमध्ये स्वत:चे मुलं, स्वत:च्या मुली आणि स्वत:चे नातेवाईक, हा प्रश्न मीडियानं समजून घ्यावा, असं यावेळी शिवसेना आमदार अंबादास दानवे म्हणालेत.
Published on: Aug 09, 2022 05:23 PM