‘तो’ निर्णय तर बाळासाहेबांनी घेतला, आता दुसरे विनाकारण श्रेय घेतायेत; अंबादास दानवे आक्रमक

| Updated on: Feb 16, 2023 | 12:41 PM

शिवसेना ठाकरेगटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेगटावर टीका केली आहे. तसंच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा ते काय म्हणालेत...

औरंगाबाद : शिवसेना ठाकरेगटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेगटावर टीका केली आहे. तसंच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शहरांची नावं बदलण्याचा निर्णय उध्दव ठाकरे यांनी निर्णय घेतला होता. हा निर्णय केंद्राकडे पाठवण्यात आला असावा मात्र केंद्राने हा निर्णय घेतला नाही, भाजप फक्त दाखवण्यासाठी हिंदुत्व बोलतात का?, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. 9 मे 1988 ला बाळासाहेब ठाकरे यांनी शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र केंद्राने तो निर्णय घेतला नाही, असंही ते म्हणाले. रोहित पवार यांच्या म्हणाले तसं राज्यात भूकंप येऊ शकतो. सध्या सरकारमध्ये आमदारांची अवस्था चांगली नाही. ते नाराज आहेत, असंही दानवे म्हणालेत.

Published on: Feb 16, 2023 12:41 PM
१२ वी परीक्षेवर बहिष्कार, प्रसंगी आत्मत्याग, का घेतला शिक्षकांनी हा टोकाचा निर्णय ?
पुणे भाजपतील नेत्यांमध्ये नाराजी? बड्या नेत्याने खरी परिस्थिती सांगितली…