“शरद पवार यांचा पाठिंबा असता तर, 2 दिवसात सरकार पडलं नसतं”, अंबादास दानवे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार

| Updated on: Jun 30, 2023 | 7:41 AM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. "2019च्या निवडणुकीनंतर शरद पवार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. पण नंतर त्यांनी माघार घेत, आमच्यासोबत डबलगेम केला," असा दावा फडणवीस यांनी केला.याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. “2019च्या निवडणुकीनंतर शरद पवार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. पण नंतर त्यांनी माघार घेत, आमच्यासोबत डबलगेम केला,” असा दावा फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आमचा पाठिंबा होता तर चोरुन शपथ का घेतली? असा सवाल त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “शरद पवार यांचा जर पाठिंबा असता तर 2 दिवसात सरकार पडलं नसतं, पण यातून भाजपचा सत्तेसाठी किती हव्यास आहे हे समोर आलं असतं, सत्तेसाठी जाणवे काढून टाकतात ही स्थिती आहे,” असं अंबादास दानवे म्हणाले.

Published on: Jun 30, 2023 07:41 AM
500 किलो फळांच्या आरासाने सजले विठ्ठल रखुमाईचे मंदिर, पाहा हा व्हिडिओ
राहुल कनाल शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? श्रीकांत शिंदे यांचं सूच वक्तव्य; म्हणाले…