इम्तियाज जलील यांची खासदारकी रद्द करा; अंबादास दानवे यांनी ‘ही’ मागणी का केली?
शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी औंरगजेबची कबर हटवण्याची मागणी केली आहे. त्यालाही दानवे यांनी उत्तर दिलं आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याआधी औरंगजेबाचे विचार मिटण्याची गरज आहे, असं दानवे म्हणालेत.
छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं संसदेचं सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी ठाकरेगटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. इम्तियाज जलील हे औरंगजेबचा उदोउदो करतात. त्याचं उदात्तीकरण करतात. औरंगजेब हा देशद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही होता. देशद्रोही औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या इम्तियाज जलील यांचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर tv9 मराठीशी बोलत होते.
Published on: Mar 06, 2023 01:27 PM