“इर्शाळवाडीत घडलेली घटना भयावह”, अंबादास दानवे यांच्याकडून दुर्घटनास्थळाचा आढावा
रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 75 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही दुर्घटनाग्रस्त ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
रायगड, 20 जुलै 2023 | रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंगराचा कडाच कोसळल्याने इर्शाळवाडीतील घरे जमीनदोस्त झाले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 75 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही दुर्घटनाग्रस्त ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेतून बचावलेल्या ग्रामस्थांशी दानवे यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी ही दुर्घटना भयावह असल्याचं म्हटलं आहे.
Published on: Jul 20, 2023 02:32 PM