“नीलम गोऱ्हे उपसभापती पदावर कायम राहिल्या तर लोकशाहीचा अपमान”, ठाकरे गटाची टीका
काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. यानंतर आज महाविकास आघाडीने नीलम गोऱ्हे यांना उपसभापती पदावरून हटवण्याची राज्यपालांकडे मागणी केली आहे.
मुंबई, 17 जुलै 2023 | काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. यानंतर आज ठाकरे गटाने नीलम गोऱ्हे यांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाने यासाठी ठाकरे गटाने विधीमंडळ सचिवांना पत्र लिहिलं आहे. तसेच आमचा नीलम गोऱ्हेंवर विश्वास नाही, त्यांना नैतिक दृष्ट्या पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. दरम्यान नीलम गोऱ्हे यांना उपसभापती पदावरून हटवण्याची राज्यपालांकडे मागणी करण्यात आली आहे. मविआच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली, अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली आहे.
Published on: Jul 17, 2023 02:48 PM