शिवसेनेच्या 4 मंत्र्यांना डच्चू मिळणार? अंबादास दानवे म्हणतात, “जैसी करनी वैसी भरनी”

| Updated on: Jun 13, 2023 | 8:37 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 5 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 5 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जैसी करनी वैसी भरनी आहे. भारतीय जनता पार्टीची एक पद्धत आहे, स्वतः काय करायचं नाही मात्र एकमेकात भांडण करायला लावायचं.याचं कारण सध्या भारतीय जनता पार्टीला शिंदे गटातले काही आमदार जड झालेले आहेत. फार दिवस हे सरकार या 40 जणांना जवळ ठेवेल असं दिसत नाही. पाच नसतील मात्र दोघा-तिघांना काढू शकतात. दादा भुसे, अब्दुल सत्तार, या दोघांविषयी नक्कीच भारतीय जनता पार्टी नाराज असल्याचे कळते.फार दिवस या सरकारचा तमाशा नाटक चालणार नाही”, असं अंबादास दानवे म्हणाले.

Published on: Jun 13, 2023 08:37 AM
‘लाठीचार्जवरून भाजप नेत्याचा विरोधकांना थेट आवाहनच; म्हणाला, ‘राजनीती करायची…’
‘घरामध्ये गाढव पाळणारे सदावर्ते काय खातात हे तपासलं पाहिजे’