“सत्ताधाऱ्यांना क्लीनचिट देणारं सरकार राज्यात”, संजय शिरसाट प्रकरणावर अंबादास दानवे म्हणाले…

| Updated on: May 31, 2023 | 4:44 PM

शिवसेनेचे नेते, आमदार संजय शिरसाठ यांना पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संजय शिरसाट यांना क्लीन चिट दिली आहे. यावर विधान परिषदेचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे नेते, आमदार संजय शिरसाठ यांना पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संजय शिरसाट यांना क्लीन चिट दिली आहे. यावर विधान परिषदेचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सुषमा अंधारे यांच्या प्रकरणात संजय शिरसाट यांना ज्या पद्धतीने क्लीन चीट दिली जात आहे. त्यावरून हे सरकार फक्त क्लीन चिट देणारे सरकारच ठरत आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात संजय शिरसाट यांच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचे दानवे यांनी सांगितले”, असं अंबादास दानवे म्हणाले.

Published on: May 31, 2023 04:44 PM
“…तर मी स्वत: फाशीवर जाईन”, लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर ब्रिजभूषण सिंह यांचं वक्तव्य”
“मी सांगतो आणि फडणवीस तिजोरी उघडतात”, मुख्यमंत्री शिंदे यांचा गौप्यस्फोट