“शिंदे चांगले प्रोड्युसर, चांगले डारेक्टर”, शिवसेनेच्या जाहिरातीवरुन ठाकरे गटाची टीका

| Updated on: Jun 13, 2023 | 3:28 PM

राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वे झाला आहे. त्या सर्वेची जाहिरात शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राज्यातील राजकारणात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. आता या जाहिरातीवरुन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वे झाला आहे. त्या सर्वेची जाहिरात शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राज्यातील राजकारणात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. आता या जाहिरातीवरुन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगले प्रोड्युसर आहेत आणि डायरेक्टर सुद्धा आहेत. स्वत:चं प्रोडक्शन त्यांनी चित्रपटातून कसं केलं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. या जाहिरातीत ते सांगत आहेत की, 49 टक्के पसंती ही आम्हांला आहे. मग 51 टक्के विरोधक सुद्धा आहेत हे त्यांनी विसरून नये. तुम्ही म्हणता की महाराष्ट्रातील जनता भाजप-शिवसेनेला 46 टक्के पसंती देते तर 54 टक्के तुमच्या विरोधात आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात धूळफेक करणारी ही खोटी जाहिरात आहे. एकप्रकारे महाराष्ट्रातला मोठा नेता दाखवण्याचा हा प्रकार आहे”, असं अंबादास दानवे म्हणाले.

Published on: Jun 13, 2023 03:28 PM
बिपरजॉय चक्रीवादळाच्या संकटादरम्यान ‘या’ चार राज्यांत भूकंपाचे मोठे हादरे
जॅक डोर्सी दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; केली कोणती मागणी?