‘तो चिल्ल्लर त्यांच्यावर…?’, राजकारणातला इम्रान हाश्मी या टीकेवर नितेश राणे यांना कोणी लगावला टोला

| Updated on: Aug 10, 2023 | 2:53 PM

तर यानंतर याचमुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. त्यांनी, राहुल गांधी यांचं भाषण म्हणजे कॉमेडी सर्कस? म्हणायचं काय? तर राहुल गांधी फ्लाईंग किस देत फिरत होते. ते योग्य वाटतं का? यांना राजकारणातला इम्रान हाश्मी म्हणायचं का?, अशी टीका नितेश राणे यांनी केली होती.

मुंबई, 10 ऑगस्ट 2023 । राहुल गांधी यांच्या कृतीवरून राज्यासह देशात भाजप आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांनी अधिवेशनात भाषणादरम्यान फ्लाईंग किस दिलं असा आरोप केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. तर यानंतर याचमुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. त्यांनी, राहुल गांधी यांचं भाषण म्हणजे कॉमेडी सर्कस? म्हणायचं काय? तर राहुल गांधी फ्लाईंग किस देत फिरत होते. ते योग्य वाटतं का? यांना राजकारणातला इम्रान हाश्मी म्हणायचं का?, अशी टीका नितेश राणे यांनी केली होती. त्यावरून ठाकरे गटाचे नेते विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी नितेश राणे चिल्ल्लर आहेत. त्यांच्यावर कोण बोलणार अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Aug 10, 2023 02:36 PM
‘सोमय्यांचा व्हिडिओ आला त्याच्यावर आधी यांनी बोलावं’; भाजपवर शिवसेना नेत्याचा हल्लाबोल
भाजपच्या 45 मिशनवर शिवसेना नेत्याची सडकून टीका, म्हणाले, ‘भाजपचं डोकं… 4 आणि 5 जागा ’