Video : वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये!, मनसेचा आदित्य ठाकरेंना सल्ला
शिवसेनेत उभी फूट पडलेली असताना मनसेकडून शिवसेनेला डिवचलं जातंय. मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. आणि आदित्य यांच्या जुन्या विधानांचा संदर्भ देत टोला लगावण्यात आला आहे. “नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘संपलेला पक्ष’ म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे […]
शिवसेनेत उभी फूट पडलेली असताना मनसेकडून शिवसेनेला डिवचलं जातंय. मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. आणि आदित्य यांच्या जुन्या विधानांचा संदर्भ देत टोला लगावण्यात आला आहे. “नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘संपलेला पक्ष’ म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस झाले आणि चिन्ह देखील गमावण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले! म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये! #शिल्लकसेना”, अशी पोस्ट मनसे वृत्तांत अधिकृत या पेजवरून शेअर करण्यात आली आहे. तसंच मनसे नेते अमेय खोपकर यांनीही हेच ट्विट केलं आहे.
Published on: Jul 09, 2022 12:49 PM