अमित देशमुख यांचा टोला कुणाला? मला घरी या म्हणता, मी म्हणतो तुम्ही स्वघरी..
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
लातूर : सरकारची ही पाच वर्ष खरंच चमत्कारी राहिली आहेत. पहिले अडीच दिवसांचे सरकार आले. दुसरे अडीच वर्षांचे आणि आता हे तिसरे सरकार सुरु आहे. त्यापाठोपाठ चौथे सरकार कधीही येऊ शकेल. काहीही सांगता येत नाही, असं राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख ( AMIT DESHAMUKH ) यांनी म्हटलंय.
आम्ही भाजपमध्ये जाणार असं काही जण सांगत आहेत. कितीही वादळे आली, किती वारे आले तरी वाडा तो तिथेच होतो. तसेच कितीही वादळे आली तरी लातूरता देशमुख वाडा तिथेच राहणार, असे सांगत त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चाना पूर्णविराम दिलाय.
भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपात येण्याची इच्छा अनेकजण व्यक्त करत आहेत. कदाचित लातूरच्या प्रिन्सची पण इच्छा झाली असेल. असे म्हटलं होतं. त्यावर अमित देशमुख यांनी मला तुमच्या घरी या म्हणताय. तुम्ही स्वगृही यावे असं जर मी म्हणालो तर तेच संयुक्तिक ठरेल, असा टोला लगावलाय.