लातूरमध्ये अमित देशमुख यांनी उस शेतीची केली पाहणी
शिल्लक ऊसा बद्दल शेतकऱ्यांनी काळजी करू नये पूर्ण ऊसाचे गाळप केल्या शिवाय साखर कारखाने बंद होणार नाहीत ,असे आश्वासन लातुरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले आहे.
शिल्लक ऊसा (Sugar cane) बद्दल शेतकऱ्यांनी काळजी करू नये पूर्ण ऊसाचे गाळप केल्या शिवाय साखर कारखाने बंद होणार नाहीत ,असे आश्वासन लातुरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले आहे. लातुर जिल्ह्यातल्या शेकडो शेतक-यांचा ऊस आणखीनही शेतात उभा आहे. अनेक ठिकाणी शॉर्टसर्किटने ऊसाला आग लागल्याच्या घटना घडत आहेत. कारखाना ऊस घेऊन जाणार नाही,आपले मोठं नुकसान होणार या चिंतेत शेतकरी आहेत . करखान्यांकडे पाठपुरावा करूनही ऊसाची तोड होत नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यांना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिलासा दिला आहे. जिल्ह्यातल्या ऊसाची पूर्ण तोड झाल्या शिवाय साखर कारखाने बंद होणार नाहीत असं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.