अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेवेळी लोकसभेत गदारोळ; विरोधकांच्या आरोपांवर अमित शाह आक्रमक
आज अविश्वास ठराव मांडताना खासदार गौरव गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही गंभीर आरोप केले. यानंतर लोकसभेत गदारोळ माजला. यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर तोफ डागली.
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023 | पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने मणिपूरचा मुद्दा लावून धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर बोलावं अशी मागणी होत आहे. 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान यावर चर्चा होणार. चर्चेच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील. अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी एकूण 12 तासांचा वेळ देण्यात आला आहे. आज अविश्वास ठराव मांडताना खासदार गौरव गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही गंभीर आरोप केले. यानंतर लोकसभेत गदारोळ माजला. यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर तोफ डागली.
Published on: Aug 08, 2023 01:56 PM