‘मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय….,’ काय म्हणाले अमित शाह

| Updated on: Jul 21, 2024 | 7:24 PM

युपीएकडून केंद्रातून महाराष्ट्राला 1 लाख 91 हजार कोटी मिळाले होते. नरेंद्र मोदी यांनी 10 लाख पाच हजार कोटी रुपये दिले आहे. पवार साहेब पुण्याचा कोणताही नाका निवडा तुम्हाला आमचा मुरलीधर मोहळ हिशेब मागेल...

प्रत्येक कार्यकर्त्यांना कमळाला निवडून आणण्यासाठी पर्यत्नांची पराकाष्ठा करावी. तुम्ही एनडीएला पुन्हा वैभव मिळवून देणार की नाही ?असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थितांना केला. त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना आवाज ऐकून ते म्हणाले की जरा जोराने बोला….ऐसे नही चलेगा भाई मैं ‘मैं बनिए का बेटा हू गॅरंटी बगैर नही जाऊंगा असे अमित शाह यांनी सांगितले. भाजपाचा प्रत्येक उमेदवार निवडून आलाच पाहीजे एकदा का …महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा आपण जिंकला की राहुल गांधी यांचा अहंकार चुर..चुर होऊन जाईल असेही ते म्हणाले. रोड वेजसाठी 75 हजार कोटी दिले, रेल्वेसाठी 2 लाख 10 हजार कोटी दिले, 1 लाख कोटीचा मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन चार हजार कोटी एअर पोर्टच्या आधुनिकरणाला दिले, न्हावाशेवा सहा पदरी अटल सेतूचे उद्घाटन झाले, 11 हजार कोटीचा पालखी मार्ग झाला, रेल्वेचे 5800 किमीचे 34 नवीन प्रकल्प आले, 561 कोटीतून 9 विमानतळाचे आधुनिकीकरण केले, मस्त्यपालनासाठी 2600 कोटी रुपये दिले आणि तसेच मासेमारी करणाऱ्यांसाठी मोठमोठी मस्त्यकेंद्रे स्थापित केली. पवार तुम्ही विकास केल्याचे कुठल्या तोंडाने सांगता. तुम्ही कृषीमंत्री होता. शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेला महाराष्ट्राच्या सहकारी कारखान्यांचा दहा हजार कोटीचा ‘इन्कम टॅक्स’चा प्रश्न मी सहकार खात्यात आल्यावर नरेंद्र मोदींकडे घेऊन गेलो आणि मोदींनी केवळ दीड मिनिटांत तो सोडवल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

Published on: Jul 21, 2024 07:23 PM
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
जगबुडी नदीवरील पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर एक लेनची वाहतूक बंद