शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठ थीमपार्क होणार; अमित शाह यांचं वक्तव्य

| Updated on: Feb 19, 2023 | 3:26 PM

बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं आज लोकार्पण झालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते शिवसृष्टीचं लोकार्पण पार पडलं. यावेळी ते काय म्हणाले? पाहा...

पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं आज लोकार्पण झालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते शिवसृष्टीचं लोकार्पण पार पडलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना अमित शाह यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या कार्यावर भाष्य केलं. “शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठ थीमपार्क होणार आहे आणि झालं पण पाहिजे. फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील इतिहास प्रेमींसाठी ही महत्वाची जागा आहे, असं अमित शाह म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर पाकिस्तानची बॉर्डर आपल्या घराजवळ राहिली असती, हे यशवंतराव चव्हाण यांचं वाक्यही अमित शाह यांनी वाचून दाखवलं.

संजय राऊत यांचे पक्ष खरेदीचे आरोप म्हणजे…, सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार करत थेट साधला निशाणा
कसबा निवडणुकीत उमेदवार नवा ट्विस्ट, काँग्रेसचा मोठा नाराज नेता प्रचारात उतरणार