Devendra Fadnvis : अमित शाह यांचा दौरा नियोजित, राज ठाकरे अन् अमित शाह यांच्या भेटीवर काय म्हणाले फडणवीस?

| Updated on: Sep 03, 2022 | 6:48 PM

त्यानुसार आता मनसे आणि भाजपात युती होईल असा अंदाज बांधला जात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट होणार नाही असेच संकेत दिले आहेत. कारण त्यांचे मुंबईत नियोजित कार्यक्रम आहेत. तर अमित शाह हे पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

मुंबई : (Amit Shah) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सवाच्या दरम्यान (Lalbag Ganesh) लालबागच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी रविवारी मुंबईत दाखल होत आहेत. यंदा मात्र ते मनसे प्रमुख राज ठाकरे यांची देखील भेट घेतील अशी चर्चा रंगली होती. यापूर्वी भाजपाच्या अनेक नेत्यांनी (Raj Thackeray) राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहे. त्यानुसार आता मनसे आणि भाजपात युती होईल असा अंदाज बांधला जात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट होणार नाही असेच संकेत दिले आहेत. कारण त्यांचे मुंबईत नियोजित कार्यक्रम आहेत. तर अमित शाह हे पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन इतर काही ठिकाणी दर्शनासाठी जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट होईलच असे नाही.

Published on: Sep 03, 2022 06:48 PM
Kishori Pednekar | शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, किशोरी पेडणेकर यांनी ठणकावले
Kishori Pednekar : राज ठाकरे हे कुठेही जाऊ शकतात, भाजप-मनसे युतीच्या चर्चेवरुन शिवसेनेचा हल्लाबोल..!