“आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर…”, इर्शाळवाडी दुर्घटनेवरुन अमित ठाकरे यांचा सरकारवर निशाणा

| Updated on: Jul 21, 2023 | 11:34 AM

रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. या दुर्घटनेत 16 १६ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर मनसे विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

जळगाव, 21 जुलै 2023| रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. या दुर्घटनेत 16 १६ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर मनसे विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “इर्शाळवाडी गावातले 75 नागरिक सुखरुप आहेत असं सांगितलं जातं आहे. मात्र त्यांच्याकडे आता काय उरलं आहे? इर्शाळवाडीची घटना ही अत्यंत दुर्दैवी, याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले. राज ठाकरेंनी आधी सांगितलं होतं. त्यांना काय अंदाज आला होता माहिती नाही. पण त्यांनी सावध केलं होतं. हे सगळे आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर वेळीच लक्ष घातलं गेलं असतं.”

Published on: Jul 21, 2023 11:34 AM
“मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत द्या”, मनसेची सरकारकडे मागणी
पालकमंत्र्यांचे पालिकेत बस्तान, ठाकरे गट आक्रमक, घेणार आयुक्तांची भेट !