अमित ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर;बैठकाचं सत्र, मनसेची पुढची राजकीय भूमिका काय?
Amit Thackeray on Nashik Daura : अमित ठाकरे नाशकात, तरूणाईशी संवाद अन् बैठका; आगामी नाशिक महापालिका निवडणुकीची रणनिती ठरण्याची शक्यता
नाशिक : मनसे नेते अमित ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या ते बैठका घेणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे देखील आज नाशिकमध्ये आहेत. युवा सेनेच्या कार्यालयांचं ते उदघाटन करणार आहेत. रोजगार मेळाव्याला देखील ते हजेरी लावणार आहेत. दोन युवा नेते आज विविध कार्यक्रमांसाठी नाशिकमध्ये आहेत. अमित ठाकरे काही वेळाआधी नाशकात दाखल झालेत. आज आणि उद्या ते बैठका घेणार आहेत. आगामी नाशिक महापालिका निवडणुकांची जबाबदारी अमित ठाकरे यांच्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी अमित ठाकरे नाशिक दौरा करत आहेत.
Published on: Feb 28, 2023 12:43 PM