“महाराष्ट्रात काम करणारा एकच पक्ष तो म्हणजे…”, ‘या’ युवा नेत्याचा मोठा दावा

| Updated on: Jun 30, 2023 | 8:27 AM

चेंबूर विधानसभा येथे मनसेतर्फे आषाढी एकादशीच्या निमिताने आयोजित कार्यक्रमात मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांनी हजेरी लावली. तसेच चेंबूर घाटला येथील संत बाळूमामा मंदिरात ही अमित ठाकरे यांनी दर्शन घेतले. यावेळी येथील धनगर समाज बांधवांनी अमित ठाकरे यांना काठी आणि घोंगड देत विशेष सत्कार केला.

मुंबई: चेंबूर विधानसभा येथे मनसेतर्फे आषाढी एकादशीच्या निमिताने आयोजित कार्यक्रमात मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांनी हजेरी लावली. तसेच चेंबूर घाटला येथील संत बाळूमामा मंदिरात ही अमित ठाकरे यांनी दर्शन घेतले. यावेळी येथील धनगर समाज बांधवांनी अमित ठाकरे यांना काठी आणि घोंगड देत विशेष सत्कार केला. यावेळी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रात काम करणारा एकच पक्ष आहे, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्यामुळेच मनसेकडे तरुणांचा ओढा वाढतोय. मनसे जोमाने काम करत आहे म्हणूनच मनसेमध्ये लोक येतायत.मी महाराष्ट्रभर दौरे केले आहेत. आता पुन्हा मराठवाड्याचा दौरा करतोय. पाचशे ते सहाशे नियुक्तया मराठवाड्यात केल्या जाणार आहेत.”

Published on: Jun 30, 2023 08:27 AM
राहुल कनाल शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? श्रीकांत शिंदे यांचं सूच वक्तव्य; म्हणाले…
शरद पवार यांनी पुण्यातील ‘त्या’ रिक्षावाल्याचं का केलं कौतुक? कारण काय? पाहा व्हिडीओ…