Amit Thackery Visit Charkop | अमित ठाकरेंची चारकोप विधानसभेला भेट

| Updated on: Jun 20, 2022 | 12:51 PM

महाराष्ट्रा नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी चारकोप विधानसभेला भेट दिली आहे. यावेळी तरुण विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने मनसेत प्रवेश केला

महाराष्ट्रा नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी चारकोप विधानसभेला भेट दिली आहे. यावेळी तरुण विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने मनसेत प्रवेश केला.  मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांचे चारकोप विधानसभेत जल्लोषात स्वागत व आदर करण्यात आला.अमित ठाकरे यांनी उत्तर मुंबईतील विविध विभागांना भेटी देऊन विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि तरुणांना पक्षाशी जोडले.या दौऱ्यात अमित ठाकरे यांनी चारकोप विधानसभेच्या मनसे कार्यालयात तरुण विद्यार्थ्यांसोबत तासनतास बसून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.चारकोप विधानसभेत अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत हजारो तरुणांनी मनसे विद्यार्थी सेनेत प्रवेश करून सदस्यत्व घेतले आहे. चारकोप विधानसभेचे मनसे अध्यक्ष दिनेश साळवी यांनी सांगितले की, अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत हजारो तरुणांनी मनसे विद्यार्थी सेनेत प्रवेश करून सदस्यत्व घेतले आहे.

Published on: Jun 20, 2022 12:51 PM
VIDEO : Devendra Fadanvis यांनी भाजपच्या आमदार Mukta Tilak यांची घेतली भेट
VIDEO : Rahul Gandhi ED | राहुल गांधी चौकशीसाठी ईडी कार्यालयाकडे रवाना