“भाजपची शिवरायांबद्दल भूमिका काय? ते स्पष्ट करावं”, अमोल कोल्हे आक्रमक

| Updated on: Nov 20, 2022 | 3:23 PM

त्रिवेदी यांच्या विधानावर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi Statement) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते, खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने असं विधान करणं चूक आहे. भाजपला नेमकं खुपतंय काय? वारंवार अशी विधानं का केली जात आहेत? तुम्ही जरा इतिहासाचा अभ्यास करा. त्यासाठी हवं तर काही पुस्तकं पाठवतो. शिवप्रताप गरूड या सिनेमाची लिंक पाठवतो. ती बघा आणि इतिहास जाणून घ्या. त्रिवेदी यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, असं अमोल कोल्हे म्हणालेत.

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर भाजपची पहिली प्रतिक्रिया, बावनकुळे म्हणाले…
हुतात्मा स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन