‘खुपते तिथे गुप्ते’ च्या प्रश्नात अमोल कोल्हे यांचे राज ठाकरे यांनी टोला, शरद पवार यांच्यावरील टीकेला सडेतोड उत्तर

| Updated on: Jul 18, 2023 | 3:31 PM

‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम सुरू झाला आहे. येथे अनेक राजकीय आणि इतर क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला हजेरी लावतात. ज्यात अनेक प्रश्नांचा उलगडा होतो.

मुंबई, 18 जुलै 2023 | एका खासगी मराठी चँनेलवर काही दिवसांपूर्वी ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम सुरू झाला आहे. येथे अनेक राजकीय आणि इतर क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला हजेरी लावतात. ज्यात अनेक प्रश्नांचा उलगडा होतो. तर खुमासदार चर्चाही पहायला मिळते. आताही ‘खुपते तिथे गुप्ते’ च्या पुढील भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उपस्थित लागली आहे. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तर दिली आहेत. यावेळी सूत्रसंचालक अवधूत गुप्ते याने कोल्हेंना काही प्रश्न विचारले. ज्यात शरद पवार यांच्यावर राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाचा देखील समावेश आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना, त्यांनी जातीपातीचं राजकारण केल्याचा आरोप केला होता. त्यावर कोल्हे यांनी उत्तर देत राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. यावेळी कोल्हे यांनी, जर असं कोण बोलत असेल तर आधी त्यांनी शरद पवार यांनी काय केलं हे पहावं. महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण आणताना त्यांनी ती महिला कोणत्या धर्माची, जातीची आहे हा विचार केला नाही. याचबरोबर याच कार्यक्रमात पोटदुखी आणि डोकेदुखी गोळी बद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावरून त्यांनी ही गोळी देवेंद्र फडणवीस यांना देऊ असं उत्तर दिलं आहे. तर सध्या ‘खुपते तिथे गुप्ते’ च्या या अमोल कोल्हे भागाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

Published on: Jul 18, 2023 08:21 AM
सोलापूर पाठोपाठ आता ‘या’ जिल्ह्यात लावलं गाढवाचं लग्न; श्रद्धेपोटी केला प्रकार, तर लग्नाची होतेय चांगली चर्चा
Superfast 50 | मुंबईत पावसाची रिपरिप सुरू, पुणे, कोकण, विदर्भाला अलर्ट, मात्र पुणे करांच्या चिंतेचं कारण काय?