“मी खासदारकीचा राजीनामाही देईन, कारण…”, अमोल कोल्हे यांची नेमकी भूमिका काय?

| Updated on: Jul 04, 2023 | 8:34 AM

राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीच्या 30 आमदारांसह खासदार अमोल कोल्हेही दिसून आले. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांनी भूमिका बदलली आणि आपण शरद पवार साहेबांसोबत असल्याचं ट्वीट केलं. याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई: सध्या राज्याच्या राजकारणात उलथापालथ सुरू आहे.राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीच्या 30 आमदारांसह खासदार अमोल कोल्हेही दिसून आले. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांनी भूमिका बदलली आणि आपण शरद पवार साहेबांसोबत असल्याचं ट्वीट केलं. याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “अजित पवार यांच्याशी एका विषयावर भेट झाली आणि तिथून मी शपथविधी सोहळ्याला गेलो. त्यावेळी मला अजिबात कळले नाही की, आजच शपथविधी होणार आहे. मी तिथे लगेच पोहोचलो. अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले, सर्वप्रथम माझा प्रश्न होता की, ही लोकशाही कोणत्या दिशेने चालली आहे? कोणाशीही वैयक्तिक वैर नाही, पण धोरणाच्या विरोधात उभे राहून बोलणे गरजेचे आहे.माझ्याकडे काय झाले? याचे उत्तर नव्हते. मी स्वतःला विचारले की, मला सामील व्हायचं आहे का? तेव्हा…,” अमोस कोल्हे नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ….

 

Published on: Jul 04, 2023 08:34 AM
सरकारमध्येच अजित पवार आल्याने शिंदे गटाची गोची? नाराजी नाट्यही सुरू; अनेक आमदारांत नाराजीचा सुर
अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शपथविधीवरून किरीट सोमय्या यांची पंचाईत; पहा काय बोलले