Amol Mitkari : देवेंद्र फडणवीस खुनशी प्रवृत्तीचे, ते कधीच मास लिडर होऊ शकत नाहीत; अमोल मिटकरींचा टोला
एकनाथ शिंदे यांचाही अमोल मिटकरी यांनी समाचार घेतला. शिंदे साहेबांना मोदींनी 12 तास भेट दिली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यात खुनशी प्रवृत्ती आहे, ते मास लीडर होऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
पुणे : निर्णय आपल्या बाजूने लागणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने येणार, हे सरकार औटघटकेच आहे, पुन्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विरोधीपक्ष नेते व्हावे लागेल, मामा तुम्ही पुन्हा मंत्री होणार, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते. एकट्या शहाजी पाटलांना 180 कोटींचा निधी दिला आहे, मात्र तरी आरोप केला जातो फक्त राष्ट्रवादीला निधी दिला, असे मिटकरी म्हणाले. सर्व आमदारांना कोट्यवधीचा निधी अजितदादांनी दिला. अजितदादांनी (Ajit Pawar) जर पहाटेची शपथ घेतली नसती तर राष्ट्रपती राजवट उठली नसती, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांचाही त्यांनी समाचार घेतला. शिंदे साहेबांना मोदींनी 12 तास भेट दिली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यात खुनशी प्रवृत्ती आहे, ते मास लीडर होऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
Published on: Jul 23, 2022 07:30 PM