पवार, आव्हाडांविरोधात बोलला आता ‘औरंगजेबजी’ म्हणालात; माफी मागा, अन्यथा… : अमोल मिटकरी
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाडांवर टीका करताना, ते खोटी प्रसिद्धी घेण्यासाठी स्टंटबाजी करतात असं म्हटलं. त्याचवेळी त्यांनी औरंगजेब याचा औरंगजेबजी असा उल्लेख केला. या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी टीका केली.
अकोला : आधी अजित पवार आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपने राज्यभर रान उठनलं. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. तर त्या वक्तव्यावरून बावनकुळे यांनी २४ तासांत माफी मागावी असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना बावनकुळे यांनी औरंगजेब याचा औरंगजेबजी असा उल्लेख केला. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. तसेच औरंगजेबजी असा उल्लेख करणाऱ्या बावनकुळे यांना माफी मागावी, अशी मागणी त्यानंतर अमोल मिटकरी यांनी केली.
त्याचबरोबर बावनकुळे यांनी २४ तासांत माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर आंदोल करणार असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
Published on: Jan 04, 2023 10:06 PM