“…तोपर्यंत भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही”, अमोल मिटकरी यांचा दावा
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सत्ताधारी पक्षांवर टीका केली आहे. अब्दुल सत्तार यांच्याबद्दल केंद्रामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. जोपर्यंत पाच मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाही, तोपर्यंत भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे.
मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सत्ताधारी पक्षांवर टीका केली आहे. “अब्दुल सत्तार यांच्याबद्दल केंद्रामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. जोपर्यंत पाच मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाही, तोपर्यंत भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे. गुलाबराव पाटील, संजय राठोड, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि तानाजी सावंत अशा वादग्रस्त मंत्र्यांमुळे मंत्रीमंडळ विस्तार रखडलेला आहे, यासाठी वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत. आणि ज्या दिवशी विस्तार होईल, त्या दिवशी तुम्हाला दोन्ही गटांमध्ये मारामाऱ्या झाल्याचे दिसतील”, असं अमोल मिटकरी म्हणाले.
Published on: Jun 20, 2023 01:45 PM