Amol Mitkari On Mohit kamboj | मोहित कंबोज यांना तोलामोलाचं उत्तर देणार! अमोल मिटकरी यांचं आव्हान
यादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कंबोज हा काही भविष्य सांगणार नाही. तो महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचं काम करत आहे. मोहित कंबोज यांना तोलामोलाचं उत्तर देणार असल्याचेही मिटकरी म्हणाले.
मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात मोहित कंबोज हे नाव चर्चेलं जात आहे. कंबोज यांनी अजित दादा पवार हे सुद्धा लवकरच जेलमध्ये जातील असे ट्वीट करत खळबळ अडवून दिली आहे. त्यानंतर यावर जेरदार रणकंदन होताना दिसत आहे. कंबोज यांच्या या ट्वीटवर विरोधक तुटून पडत आहेत. यादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कंबोज हा काही भविष्य सांगणार नाही. तो महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचं काम करत आहे. मोहित कंबोज यांना तोलामोलाचं उत्तर देणार असल्याचेही मिटकरी म्हणाले. तसेच फक्त महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची चर्चा भरकटवण्याकरता केलेला हा आभासी प्रयत्न आहे. आणि जर मोहित कंबोज या गोष्टी माहीत असतील तर मोहित कमला चौकीदार आहे का आणि जर तो असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही मिटकरी यांनी केली आहे.