Video : मोदींची मिमिक्री, फडणवीस, सोमय्यांची नक्कल! शेवटी राहत इंदौरीचा शेर, मिटकरींचं जोरदार भाषण

| Updated on: Apr 23, 2022 | 10:05 PM

अमोल मिटकरी कोल्हापुरातील कार्यक्रमात बोलत होते.

कोल्हापूर : इस्लामपुरात झालेल्या सभेतील सर्वात मोठ्या वादानंतर अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांचं कोल्हापुरात भाषण (Kolhapur NCP Event) झालं. यावेळी त्यांनी कोल्हापुरातून भाजपवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री अमोल मिटकरी (Narendra Modi Mimecry by Amol Mitkari) यांनी करुन दाखवली. नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल करत बहुजनांचं स्वातंत्र हिसकावून घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. भाजपने आम्हाला धर्म शिकवू नये, असंही ते म्हणाले. कोल्हापूरमध्ये आयोजित केलेल्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचीही नक्कल यावेळी मिटकरींनी करुन दाखवली. इतकंच काय तर किरीट सोमय्यांचीही नक्कल करत त्यांनी सगळ्या भाजपच्या नेत्यांवर टीका केली. त्यानंतर राहत इंदौरी यांचा शेरही ऐकून दाखवलाय.

Published on: Apr 23, 2022 09:23 PM
Navneet Ravi Rana | चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणात राणा दाम्पत्याला अटक
Varun Sardesai | राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर वरुण सरदेसाई यांच्यासह शिवसैनिकांची घोषणाबाजी